Award Ceremony
sakal
नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीतील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्रामार्फत दिला जाणारा २०२३ चा बाबूराव बागूल कथा पुरस्कार, रुक्मिणी पुरस्कार, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार आणि ज्ञानदीप पुरस्कार या वेळी मानकरी व्यक्तींना प्रदान करण्यात आले.