Yashwantrao Chavan Open University
sakal
नाशिक: विशेष मुलांचा सांभाळ तशी आव्हानात्मक बाब. या आव्हानाचा सामना करताना योग्यरीतीने संगोपन करता यावे, यासाठी विशेष मुलांच्या अनेक माता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी. एड. विशेष शिक्षण या अभ्यासक्रमास प्रवेश घेत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, आईच्या मायेचे पंख त्यांच्या बालकापर्यंत मर्यादित राहात नसून, शिक्षिकेच्या भूमिकेतून या माता इतर बालकांचाही सांभाळ करीत असून, त्यांचे जीवन फुलवीत आहेत.