

YCMOU exam irregularity involving students appearing for two exams simultaneously
esakal
नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी, एकाच वेळी दोन परीक्षा दिल्याचे उघडकीस आले आहे. राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ४० विद्यार्थ्यांनी हा प्रताप केला आहे. तांत्रिक अडचणीमुळे दोन विभिन्न अभ्यासक्रमांचे पेपर एकाच दिवशी आले होते. विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांना अन्य दिवशी परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध केला असताना, यापैकी काहींनी एकाच वेळी दोन परीक्षा देण्याचा चमत्कार घडविला.