Yashwantrao Chavan Open University
sakal
नाशिक: केवळ सुवर्णपदक विजेत्या मुलांना व्यासपीठावर छायाचित्रासाठी बोलविले. आम्ही शुल्क भरून हजारो रुपये खर्च करत इतक्या लांबून समारंभात टाळ्या वाजवायला आलोत का? असा संतप्त सवाल करत स्नातकांनी गोंधळ घातला. बुधवारी (ता. ४) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षान्त समारंभात घडलेल्या या प्रकाराने स्नातक, विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी समोरासमोर उभे ठाकले होते.