World Tribal Day 2022 : येवलेकरांनी अनुभवली आदिवासी संस्कृती | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A grand procession was held on Tuesday on the occasion of World Tribal Day. In the second photo, students performing dance in the program.

World Tribal Day 2022 : येवलेकरांनी अनुभवली आदिवासी संस्कृती

येवला (जि. नाशिक) : आदिवासी संस्कृतीचे पेहराव, नृत्य, गीत गात निघालेली भव्य व लक्षवेधी मिरवणूक..., क्रांतिकारकांच्या प्रतिमांना अभिवादन अन् नाट्यगृहात रंगलेला सांस्कृतिक सोहळा... याचे विलोभनीय दृश्य येवलेकरांना मंगळवारी (ता. ९) अनुभवायला मिळाले. (Yeola citizen experienced tribal culture 0n World Tribal Day 2022 nashik Latest Marathi News)

यासाठी निमित्त ठरले, ते जागतिक आदिवासी दिनाचे..! आदिवासी बांधवांची आगळीवेगळी संस्कृती येवलेनगरीत मंगळवारी अनुभवायला मिळाली. येथील सर्व आदिवासी समाजबांधवांनी दिनाच्या औचित्य साधून आदिवासी कर्मचारी, हॅप्पी आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह व साई दिशा नर्सिंग स्कूलतर्फे आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण व अभिवादन करून मिरवणुकीला सुरवात झाली. विंचूर चौफुली ते महात्मा फुले नाट्यगृहापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत आदिवासी बांधवांनी वेशभूषा करून नृत्य करून शहराचे लक्ष वेधले.

येथील नाट्यगृहात विचारमंथन व सांस्कृतिक कार्यक्रमाची वृक्षपूजन व क्रांतिवीरांच्या प्रतिमापूजनाने तहसीलदार प्रमोद हिले, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, आरटीओ पूनम दळवी, डॉ. सुरेश कांबळे, डॉ. जयश्री पवार यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी व दिशा नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले.

हेही वाचा: Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या मृत्यूमुखी

आदिवासी बांधवांमध्ये सोशिकता, जिद्द, कष्ट करण्याची ताकद असून, त्यांना योग्य दिशा मिळाली तर यशाच्या शिखरावर ते विराजमान नक्कीच होतील यासाठी शिक्षित बांधवांनी पुढाकार घेण्याचे आवाहन तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले.

पोलिस निरीक्षक अनिल भवारे यांनी समाज बांधवांनी व्यसनमुक्त होऊन मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रयत्न करावे. गट तट दूर करून आपण एक आहोत एकतेची भावना प्रत्येकाच्या मनात रुजवण्यासाठी प्रत्येक समाज बांधवांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.

सहाय्यक निबंध प्रताप पाडवी यांनी जगात आदिवासी संस्कृती महान असल्याचे सांगितले. पूनम दळवी यांनी आपल्या शैक्षणिक संघर्षाची कहाणी विद्यार्थी व समाज बांधवांसमोर मांडली. डॉ. सुरेश कांबळे, विक्रम गायकवाड, डॉ. जयश्री पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. महेंद्र पगारे, पुंजाराम पगारे आदी उपस्थित होते.

● मिरवणूक अन् कार्यक्रम लक्षवेधी!आदिवासी दिनानिमित्त नाट्यगृहात आदिवासी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात पावरी, तारपा, लग्न नृत्य, आदिवासी गीतांचे सादरीकरण शासकीय आदिवासी मुलांचे-मुलींचे वसतिगृह व साई दिशा नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी, किलबिल ग्रुप यांनी उपस्थितांचे मने जिंकले.

माजी सभापती प्रवीण गायकवाड, प्रा. वैभव सोनवणे, प्रा. जालमसिंग वळवी, शरद पाडवी, नीलेश नाईक, अमर गावित, योगेश्वर वळवी, वंजी कुवर, प्रा. युवराज घनकुटे, सुरेश पारधी, शांताराम पवार, संजय चौधरी, नितीन गावित, सुभाष वाघेरे, दीपक भोये, संतोष गावित, छगन पवार, अशोक पाडवी, उखाराम भोये, जितेंद्र शिसव, राजेंद्र पिंपळे, संतोष निकम, आबा सोनवणे, ज्ञानेश्वर माळी, राजेंद्र झाल्टे, भरत अहिरे, दत्तू ससाने, रवींद्र जाधव, हिरामण मेश्राम, लक्ष्मण दळवी, श्रीमती रोहम, प्राचार्य सचिन घोडेराव, शीतल पुरे, आशिष गावित, आरती पावरा, वैशाली पवार, दीपिका शेवाळे आदींनी संयोजन केले.

हेही वाचा: तिरंगा रॅलीने मनमाडकरांचे वेधले लक्ष; समधर्मीय नागरिकांचा सहभाग

Web Title: Yeola Citizen Experienced Tribal Culture 0n World Tribal Day 2022 Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..