
Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या मृत्यूमुखी
नरकोळ (जि. नाशिक) : पिंगळवाडे (ता. बागलाण) येथे सोमवारी (ता. ८) मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. या बिबट्याचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (3 goats killed in leopard attack Nashik Latest Marathi News)
येथील शेतकरी किरण भामरे यांचे शेतात वास्तव्य असून, घराशेजारी बांधलेल्या तीन शेळ्या मुत्यूमुखी झाल्याची बाब श्री. भामरे यांच्या सकाळी निदर्शनास आले. त्यांनी याबाबत वन विभागाला कळविले. वन विभागाचे वनरक्षक सय्यद यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.
बिबट्याच्या हल्ल्यात श्री. भामरे यांचे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. आता दिवसेंदिवस बिबट्याने कहर असून, पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पिंगळवाडे ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात पशुधन आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने कहर केला आहे. यामुळे पशुधन धोक्यात आले आहे, असे किरण भामरे यांनी सांगितले.