Yeola Flood Relief
esakal
येवला: येवला मतदारसंघात अतिवृष्टीमुळे ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाऊस व पूरपरिस्थितीमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर मोठे संकट कोसळले. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे आठ दिवसांपासून मतदारसंघात तळ ठोकून आहेत. ते नुकसानग्रस्तांना भेटी देणे, आढावा बैठक घेणे व उपाययोजना करणे अशा प्रकारे आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कार्य करीत आहेत.