येवला- शहरात विविध भागांत रस्ते उखडून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे; मात्र, खोदलेल्या भागांत पाऊस होताच सर्वत्र चिखलाचे साम्राज्य तयार होऊन नागरिकांना चालणे मुश्कील झाल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत यासंदर्भात तक्रारी गेल्या. याची दखल घेऊन शुक्रवारी (ता. २७) सकाळी भुजबळांनी सर्व ताफा, कार्यकर्ते, मीडियाला बाजूला ठेवून शहरात विविध भागांत जाऊन पाहणी केली. नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकून भुजबळांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत कानउघाडणी करीत रस्त्यांवरील चिखल तातडीने हटवा, असा आदेश दिला.