येवला: नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येथे मेळावा घेऊन प्रतिकात्मक कर्जमुक्त झाल्याची घोषणा केली. तसेच तहसील कार्यालयाच्या आवारात राष्ट्रध्वजाला साक्षी ठेवून आत्महत्या न करण्याची शपथ घेतली. मेळाव्यात येवला,नांदगाव,निफाड तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.