Yeola Monsoon
sakal
नाशिक
Yeola Monsoon : कांद्याची रोपे वाहून गेली, मका-सोयाबीन पाण्यात! येवला तालुक्यातील लाखो रुपयांचे खरिपाचे नुकसान
Incident Overview: Yeola Faces Heavy Rain Damage : येवला तालुक्यात शनिवारी सायंकाळी तीन तासांहून अधिक काळ झालेल्या मुसळधार परतीच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने कांद्याची रोपे वाहून गेली, तर मका व सोयाबीन पिके आडवी झाली.
येवला: तीन दिवसांच्या उघडिपीनंतर शनिवारी सायंकाळी परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला. तब्बल तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्यात प्रचंड नुकसान झाले असून, ५० ते ६० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाल्याचा अंदाज आहे. या पावसाने खरिपातील लाखो रुपयांचे नुकसान झाले.
