government assistance
sakal
येवला: चोवीस तासांत विक्रमी १५५ मिलिमीटर पाऊस होऊन शेतातील उभ्या पिकांचे होत्याचे नव्हते झाले. कोट्यवधींचा नव्हे तर अब्जावधीचा फटका शेतकऱ्यांना बसला. या नुकसानीपोटी शासनाने विविध निकषांनुसार मदत जाहीर केली असून, तालुकातील तब्बल ६४ हजार शेतकऱ्यांना ३८ कोटी रुपये मदत मिळणार आहे. ही मदत खात्यावर वर्ग करणे सुरू झाल्याने अडचणीतल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.