Yeola
sakal
येवला: सामर्थ्य, वेग आणि सौंदर्य यांचा संगम असलेले अश्व... लांबट, गुळगुळीत व सुबक शरीर, मानेवरून झेपावणारी लांबसडक अयाल, डोळ्यांतील तेज, लवचिक पण सबळ पाय, चालण्यातली रेखीव लय, टापांच्या आवाजातील झंकार आणि सडपातळ आकृतीतून झळकणारे नाजूक आकर्षण असा देखणा आविष्कार साधणारे शेकडो घोडे आज देशभरातून येवला येथील ऐतिहासिक घोडेबाजारात दाखल झाले.