Jal Jeevan Mission
sakal
येवला: जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेली राजापूरसह ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सध्या दिरंगाईच्या गर्तेत अडकली आहे. योजनेसाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढवून दिलेली मुदतही आता संपुष्टात आली असून, कामाची गती अत्यंत कासवगतीने सुरू आहे. परिणामी ४१ गावे आणि १० वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना २०२८ पर्यंत तरी नळाचे शुद्ध पाणी मिळेल का, असा सवाल जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.