Jal Jeevan Mission
sakal
येवला: मोठा गाजावाजा झालेल्या जलजीवन मिशन योजनेची येवला तालुक्यात फारशी फलनिष्पत्ती दिसत नाही. ३६ पैकी २२ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला असला, तरी उर्वरित १४ कामांमध्ये पाणीपुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. यामुळे प्रकल्पाचे मुख्य लाभार्थी असलेल्या सुमारे ४१ हजार लोकसंख्येला पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याची स्थिती आहे.