Yeola News : वारकऱ्यांसाठी येवल्यातील 'बासुंदी चहा' सेवा ठरली उठावदार!
14-Hour Continuous Service by 125 Yeola Kirana Merchants : जेजुरी पथावर लाखो वारकऱ्यांसाठी येवला किराणा व्यापाऱ्यांच्या वतीने दिला गेलेला बासुंदी चहा आणि पाणी; १५ केटल्स, २ टँकर दूध आणि ५ लाख खर्चातून राबवलेली सेवा.
येवला- आळंदी ते पंढरपूर पायी वारीत जेजुरीतील ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीच्या विसाव्याजवळ वारकऱ्यांना ऊर्जा मिळावी, यासाठी येवल्यातील किराणा व्यापारी असोसिएशनतर्फे लाखो वारकऱ्यांना बासुंदी चहा आणि पाणी वाटप करण्याची सेवा देण्यात आली.