Yeola Kite Festival : नयनरम्य आतषबाजीने पतंगोत्सवाला अलविदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Even as the day went down, hobbyists were releasing kites from the terrace.

Yeola Kite Festival : नयनरम्य आतषबाजीने पतंगोत्सवाला अलविदा

येवला (जि. नाशिक) : येथील आकाशात गेले तीन दिवस नानाविध सप्तरंगी पतंगांचे साम्राज्य होते, या उत्साहापुढे आकाशाचाही रंग फिका वाटत होता. आज सायंकाळी पुन्हा एकदा येथील आसमंत नयनरम्य आतषबाजीने तब्बल तासभर उजळून निघाला.

नेत्रदीपक आणि देखण्या आतषबाजीने आकाशाला जणू मनमोहक सौंदर्याचे रूप प्राप्त झाले होते. तासभर फटाक्यांची आतषबाजी करत येवलेकरांनी तीन दिवसाच्या या उत्साहाला तितक्यात आनंदात अलविदा केले. (Yeola Kite Festival Farewell to Kite Festival with spectacular fireworks display nashik news)

मनमुरादपणे आतषबाजी करत पतंगशौकिनांनी उत्साहाला अलविदा केले

मनमुरादपणे आतषबाजी करत पतंगशौकिनांनी उत्साहाला अलविदा केले

भोगी व मकरसंक्रांतीच्या दिवशी असलेला पतंगोत्सवाच्या जल्लोषाचा माहोल आज तिसऱ्या दिवशीही सकाळपासून शहरात दिसून आला. आज दिवसभरही गर्दीने भरलेल्या घरांच्या गच्या अन सप्तरंगी पतंगांनी सजलेले आकाश तसेच रात्रीपर्यत डी. जे., सुमधुर गीते अन हलकडीच्या निनादात कुटुंबासह अनेकांनी पतंग उडविण्याचा आनंद लुटला.

करीच्या दिवशी शहरातील प्रत्येक घर, इमारतींच्या गच्ची आणि धाबे व्यापून गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत आकाशात आसारीवरून मांजा पतंगाला ढिल देताना प्रचंड चढाओढ सुरू होती.

यंदाच्या उत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने अगदी तहानभूक विसरून उशिरापर्यंत गच्चीवर धूम सुरू होती. आज दिवसभर शहरातील दुकाने बंद होती. शाळांनाही सर्वांनी दांडी मारली अन सर्व कामधामही बंद होते.

सूर्य अस्ताला गेला तरी धमाल अन् पतंगोत्सवाचीच मजा लुटली. नव्हे तर रात्री उशिरापर्यंत आकाशात पतंग अन गच्चीवर डिजेचा सुमधुर आवाज निनादत होता.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Nashik News: रामतीर्थावर गौतम ऋषींची 800 वर्षांपूर्वीची मूर्ती! तीर्थजल कमी झाल्यावर मूर्तीचे घडते दर्शन

सायंकाळी दिवस मावळतीला गेला आणि धूम सुरू झाली ती आतषबाजीची... साडेसहापासून येवल्याचे आकाश जणू फटाक्यांच्या आतषबाजीने अन नेत्रदीपक रोषणाईने उजळून निघाले. रात्रीचे आठ वाजले तरी आकाशाने रोषणाईचा साज परिधान केलेला होता.

फटाक्यांच्या या रोषणाईंने आकाश अफलातून दिसले अन डोळ्याचे पारणे फेडले गेले. दिवाळीत होत नाही इतकी आतषबाजी करून येवलेकरांनी तीन दिवसांच्या पतंगोत्सवाला अलविदा करताना केली.

विविधरंगी लक्षवेधी फटाक्यांची आतषबाजी, रोषणाई होताना शेकडो दिवेही भिरभिरताना डोळे दिपून तर गेलेच पण गल्लीबोळात गच्चीवरून जोरदार फटाक्यांची आतषबाजी होत असल्याने अंधारात आसमंतही उजळून गेला होता.

या आसमंतातही काही पतंगप्रेमी आपले पतंग उंच-उंच चढवीत होते. उत्सवप्रियता जपत मजा अन्‌ मनमुराद आनंद लुटताना शौकिनांनी शानदार निरोप दिला. प्रत्येक गच्चीवरून कुठेही पाहिले तरी शहराच्या चारही कोपऱ्यातूनही आतषबाजी व धूमधडाका सुरू होता. येवलेकरांनी आणि आलेल्या पाहुण्यांनी देखील हा आनंद डोळ्यात साठवतच या उत्सवाला निरोप दिला.

हेही वाचा: Ayushman Bharat Yojana : ‘आयुष्यमान’ कार्डचे 5 लाख लाभार्थ्यांना वाटप