Yeola development
sakal
येवला: पुढील ३३ वर्षांचा पाणीपुरवठा विचारात घेऊन शहराला दररोज पुरेसा आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे. शहरातील सर्व रस्ते काँक्रिटचे करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास रस्त्याची उभारणी केली जाईल. लातूरच्या धर्तीवर विस्थापित व्यावसायिकांचे पुनर्वसन करून वाणिज्य संकुलातून व्यापार व उद्योग वाढीस चालना दिली जाणार आहे. तसेच, पैठणी फेस्टिव्हल नाशिक, पुणे आणि मुंबईत भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा महायुतीचा निर्धार आहे.