Marotrao Pawar
sakal
येवला: येथील राजकारणात मोठा भूकंप घडला असून, माजी आमदार मारोतराव पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संभाजी पवार यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर मंगळवारी (ता. १८) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठे खिंडार पडले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ मिळाले आहे.