नाशिक- येवला विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २१) मॉकपोल घेण्यात आले. मॉकपोलनंतर मतमोजणीवेळी ईव्हीएममध्ये नोंदविलेले मतदान आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांचा हिशेब जुळला. त्यामुळे ईव्हीएमवरून मतदारसंघाच्या निकालावर उपस्थित करण्यात आलेली शंका निरर्थक ठरली आहे.