येवला: मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेत अनेक बदल झाले असून, काही ठिकाणी इच्छुकांची सोय तर काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी दोन नगरसेवकांची भर पडून एकूण २६ नगरसेवकांची निवड होणार असून हे नगरसेवक १३ प्रभागांतून निवडले जातील.