Darade-Shinde
sakal
येवला: गेले आठवडाभर चर्चा आणि सस्पेन्समध्ये असलेली युती आघाडी अखेर आज अंतिम झाली. राज्यात सत्तेत असलेल्या युतीतच दोन गट पडले असून, भाजप-राष्ट्रवादी एका बाजूला, तर शिवसेना विरोधात, असे समीकरण पालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी राज्यात विरोधी बाकावर असलेल्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष शिवसेने सोबत आला आहे. हे पक्षीय समीकरण असले तरी येथील निवडणूक भुजबळ विरुद्ध दराडे-शिंदे अशीच रंगणार मात्र उघड आहे.