Municipal Election
sakal
येवला: राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये युतीबाबत एकमत न झाल्याने येथील नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण, हा गुंता अद्यापही सुटलेला नाही. परिणामी, येवला शहराचे संपूर्ण राजकीय चित्र अस्पष्ट राहिले आहे. तिन्ही पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू असून, सर्वांनीच नगराध्यक्षपदावर दावा दाखल केला. भाजपला सोबत घेण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी आणि दुसरीकडे शिवसेना प्रयत्नशील आहे, त्यामुळे सध्या सर्व राजकारण भाजपभोवती केंद्रीत झाले आहे.