Municipal Election
sakal
येवला: नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे रुपेश दराडे की राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र लोणारी यांच्या झालेल्या अटतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोणारी यांनी शिवसेनेच्या दराडे यांचा १ हजार १६५ मताधिक्याने पराभव करत नगराध्यक्षपदी विराजमान झाले. निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक ११ व शिवसेनेला १० नगरसेवक पदावर विजय मिळाला आहे. या विजयाने मंत्री छगन भुजबळ यांनी बालेकिल्ल्यातील वर्चस्व निर्विवाद राखले.