Yeola Municipal Elections
sakal
येवला: पालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याला दोन दिवस उरले तरी येथील युतीतील गुंता अद्याप सुटलेला नाही. भारतीय जनता पक्षाने सोबत यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे, त्याचवेळी शिवसेना आणि भाजपचीही चर्चा सुरू आहे. भाजपला नगराध्यक्षपद मिळाल्यास भाजप शिवसेनेसोबत जाणार की राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार, याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदाचा हा वाढत गेलेला तिढा आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात गेला असून, भाजपच्या भूमिकेवर सर्व काही अवलंबून असल्याने त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.