Chhagan Bhujbal
sakal
येवला: अंदरसूल परिसरात पुराचे पाणी घरात घुसून प्रचंड नुकसान झाले असून, मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने मतदारसंघात येत नुकसानीची पाहणी करीत दिलासा दिला. भुजबळ आले, तेव्हा गुडघ्याइतके पाणी या भागात वाहत असताना त्यात उतरून त्यांनी आपत्तीग्रस्तांना आधार दिला. नैसर्गिक संकटात शासन जनतेच्या सोबत असून, सर्व घटकांना मदत दिली जाईल. प्रथम पूरग्रस्त भागातील नागरिक व पशुधन वाचविण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.