agriculture crisis
sakal
येवला: अतिवृष्टीच्या नुकसानीच्या दुःखातून शेतकरी सावरत नाही, तोच बुधवारी (ता.२९) पुन्हा एकदा मान्सूनोत्तर पावसाने निफाड आणि येवला तालुक्याला झोडपून काढले. येवल्यात सुमारे दोन तासात ६० मिलीमीटरवर पाऊस झाला. या पावसाने तालुक्यात अनेक भागात पुन्हा एकदा पिके पाण्याखाली गेली आहेत. निफाड तालुक्यात कसबेसुकेणे परिसरातही आज झालेल्या अतिवृष्टीने द्राक्षबागांची हानी झाली आहे.