Onion Farmers
sakal
येवला: वाढत्या उत्पादन खर्चामुळे कांदा पिकवायला किलोला २५ रुपये खर्च येतो, मात्र सरकारच्या धोरणामुळे सध्या १० रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे सरकारने कांद्याला एक हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने अनुदान द्यावे, या मागणीसाठी ग्रामपंचायतींनी ठराव आंदोलन हाती घेतले आहे. बुधवारी (ता. १७) तालुक्यातील सत्यगाव व सोमठाणदेश ग्रामपंचायतींनी असा ठराव केला.