येवला: पारंपरिक उद्योगासाठी प्रसिद्ध शहरांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करून उद्योगाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याच माध्यमातून येवल्यात पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. जगातील सर्वोत्तम वस्त्र म्हणून ओळख मिळण्यासाठी पैठणीला युनेस्कोमध्ये पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.