Toll Plaza
sakal
येवला: बीओटी तत्त्वावर २००४ मध्ये काम सुरू होऊन २००७ पासून टोलवसुली सुरू झालेल्या मालेगाव- मनमाड-येवला-कोपरगाव महामार्गावरील पिंपळगाव जलाल येथील टोल नाका अखेर बंद झाला आहे. या मार्गावरून चालणाऱ्या वाहनांच्या मनगटावर बसलेले टोलचे भूत उतरले आहे. आता टोल बंद झाल्याने प्रचंड वाहतूक असलेल्या या रस्त्याची दुरवस्था होणार नाही, याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.