येवला: येवला शहर कांदा, गांधी टोप्या व पैठणीचे माहेरघर आहे. त्यामुळे येथे राज्यभरातून व्यापाऱ्यांसह ग्राहक येत असतात. या पार्श्वभूमीवर मोठी व्यापारी पेठ असल्याने येथे प्रमुख रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा तसेच तिकीट आरक्षण खिडकी तत्काळ सुरू करावी, अशी मागणी येथील भाजपचे युवानेते डॉ. महेश जोशी व कुणाल भावसार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.