Agriculture Loss
sakal
येवला: जूनमध्ये वाट पाहायला लावणारा वरुणराजा या वर्षी मेपासूनच जिल्ह्यात कोसळायला सुरू झाला. दिवाळीतही पाऊस पडला, किंबहुना या वर्षी तर सहा महिने पावसाळा चालला. शेतातली उभे पिके या पावसाने सडवली असून, अब्जावधींचे नुकसान शेतकऱ्यांचे केले आहे. पर्जन्याचा महापूर जिल्ह्याने अनुभवला असला तरी वार्षिक सरासरी मात्र गाठलेली नाही. जिल्ह्यात सरासरी ९६ टक्के पाऊस पडला असून, धो-धो पाऊस होऊनही चार तालुक्यांनी सरासरीचे शतक गाठलेले नाही.