YEO26B27108
येवला : चिंच्या मारुती मंदिर परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करताना नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी.समवेत नगरसेवक महेश काबरा,समीर समदडिया आदी.
------------
३०-२
येवल्यात दीर्घकाळ प्रलंबित
रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू
नगरसेवक काबरा, समदडियांच्या प्रयत्नांना यश
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. १० : येथे गेल्या पंचवीस वर्षांची प्रतीक्षा, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणारा त्रास अखेर संपणार असून शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील चिंच्या मारुती मंदिर ते छोटी जनता बोळ या मार्गाच्या काँक्रिटीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने नगरसेवक महेश काबरा व समीर समदडिया यांच्या प्रयत्नांतून प्रलंबित काम मार्गी लागत असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मध्यवर्ती आणि दाट लोकवस्तीच्या या परिसरातील नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. माजी मंत्री छगन भुजबळ,माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विशेष सहकार्याने काम मार्गी लागत असल्याचे सांगण्यात आले. या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी तसेच नगरसेवक समदडिया, काबरा, दीपक लोणारी, पारुल गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले. बापू गाडेकर, नाना लहरे,अक्षय परदेशी,मॉन्टी पारख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
----------------