Yeola News : येवल्यात उबाठाला मोठा धक्का! आमदार दराडे बंधूंचे कट्टर समर्थक संजय कासार यांचा शिंदे गटात प्रवेश
Sanjay Kasar and Core Team Join Eknath Shinde’s Shiv Sena : येवला येथील शिवसेना (उबाठा) गटाचे शहराध्यक्ष संजय कासार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे आणि माजी आमदार नरेंद्र दराडे उपस्थित होते
येवला: आमदार दराडे बंधू यांचे कट्टर समर्थक व येथील शिवसेना (उबाठा) गटाचे शहराध्यक्ष संजय कासार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ७) शिवसेनेत प्रवेश केला.