Crop Damage in Yeola
sakal
येवला: तालुक्याच्या कुठल्याही कोपऱ्यात नजर टाकली तरी शेतकरी कुटुंबांचे विदारक चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. कुठे मका भुईसपाट, कुठे बिट्या पाण्यात, तर कांद्याची रोपे आणि लागवड कुजली आहे. सोयाबीन, दाणे पाण्यात बुडाले आहेत. शेतकऱ्यांची राखरांगोळी झाली असून, दोन दिवस उलटूनही शेतात पाणीच पाणी साचले आहे. अशा स्थितीत ‘आता दिवाळी साजरी करायची कशी, फराळ खायचा की चिखल खायचा?’ असा सवाल शेतकऱ्यांनी डोळ्यांत अश्रू आणून केला.