Education News : येवल्याच्या शिक्षण व्यवस्थेला रिक्त जागांची साडेसाती; ३९० हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त!

Acute Teacher Shortage Hits Yeola Schools : येवला तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शेकडो शिक्षक पदे रिक्त असल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत आहे.
Teacher Shortage

Teacher Shortage

sakal 

Updated on

येवला: ज्या शिक्षणामुळे क्रांती होते, त्याच शिक्षण विभागाला अपुऱ्या शिक्षक संख्येने ग्रासले आहे. तालुक्यातील प्राथमिक मराठी व ऊर्दू शाळेत ९०, तर खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये ३००च्या वर पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्याच्या शिक्षण व्यवस्थेच्या प्रगतीला झळ बसत आहे. विद्यार्थ्यांना ओंजळ भरून द्यायला ज्ञानमंदिराला पुरेसे गुरुजीच नाहीत. पोर्टलच्या भरतीला चालना देऊन या सर्व रिक्त जागा भरल्या जाव्यात, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com