येवला- जिल्ह्यात साधारणतः ३२ हजार आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळाले आहेत. मात्र सातबारा उताऱ्यावर इतर अधिकारांत नाव दिलेले असल्याने त्यांना फार्मर आयडीपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी, आजही शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ त्यांना मिळत नसून, फार्मर आयडीसाठी शासनदरबारी चकरा माराव्या लागत आहे. या सर्व शेतकऱ्यांना तत्काळ फार्मर आयडी मिळवून द्यावेत, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.