Babasaheb Ambedkar
sakal
येवला: ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’, अशी जागतिक क्रांती करणारी ऐतिहासिक घोषणा १३ ऑक्टोबर १९३५ ला येथील कोर्ट मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. या घोषणेचा ९० वा वर्धापन दिन येथील मुक्तिभूमीवर सोमवारी (ता. १३) भरगच्च उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. राज्यभरातून हजारो भीमसैनिकांची गर्दी येथे नतमस्तक होण्यासाठी उसळणार आहे.