YIN Art Festival : कॅमेऱ्यात छबी टिपल्यानंतर उमटले भाव!

Photography
Photographyesakal

नाशिक : एखादे छायाचित्र बरेचकाही सांगून जात असते; परंतु ते छायाचित्र टिपताना छायाचित्रकारांची होणारी कसरत वा त्यासाठीचा त्याचा अँगल फार महत्त्वाचा असतो. आजच्या स्पर्धेमध्ये तीच कसरत स्पर्धकांची होताना दिसत होती. मात्र त्याचवेळी आपल्या कॅमेऱ्यात नेमकी छबी टिपल्यानंतरचा त्या स्पर्धकांच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव बरेचकाही सांगून जात होते. हे भाव या स्पर्धकांना अनुभवता आले ते ‘सकाळ-यिन’च्या कला महोत्सवामुळे... (YIN art festival Photography competition nashik news)

Photography
YIN Art Festival : रॅम्‍पवर अदाकारी, फॅशनचा जलवा!

गंगापूर रोडवरील मविप्रच्या एमएसडब्ल्यू महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘सकाळ-यिन’च्या कला महोत्सवाला शुक्रवार (ता. ११)पासून उत्साहात प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना महाविद्यालयीनदशेतच व्यक्त होण्याची संधी या कला महोत्सवातून उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. विविध स्पर्धांप्रमाणे या वेळी छायाचित्र स्पर्धेलाही विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

जवळपास साऱ्यांच्याच हाती स्मार्ट फोन आल्याने फोटोग्राफीचे आकर्षण हे प्रत्येकालाच झाले आहे. मात्र तरीही कॅमेऱ्यातून छायाचित्र टिपण्याची मजा काही औरच असते. त्याच उत्साहाने कॅमेरे घेऊन स्पर्धक विद्यार्थी ‘सकाळ-यिन’च्या कला महोत्सवातील छायाचित्र गटात सहभागी झाले होते.

कला महोत्सवाच्या छायाचित्र गटासाठी क्रीडा, निसर्ग (नेचर), स्ट्रीट फोटोग्राफी, रिफ्लेक्शन (प्रतिबिंब) व जुने सर्वकाही या विषयांतर्गत फोटोग्राफी करण्याची संधी होती. एका विषयासाठी किमान चार छायाचित्र निर्धारित वेळेत देणे बंधनकारक होते. यासाठी शहरासह जिल्हाभरातून विद्यार्थी सहभागी झाले होते. हे विद्यार्थी हाती कॅमेरे घेऊन गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकात, रावसाहेब थोरात सभागृह परिसरात विविध स्पर्धांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची छबी टिपण्यासाठी धडपडत होते.

त्यांना पाहिजे तसा अँगल टिपण्यासाठी त्यांची सुरू असलेली मेहनत वाखाणण्याजोगीच होती. तरीही नेमकी छबी आपल्या छायाचित्रात टिपता यावी, यासाठी प्रत्येक स्पर्धक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होता. या स्पर्धेसाठी जागतिक पातळीवरील नामांकित छायाचित्रकार व शूटबग्ज‌ इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स फोटोग्राफीचे संचालक प्रा. डी. एल. पवार आणि सी. जे. फोटोझोनचे संचालक चैतन्य वाघ हे परीक्षक म्हणून लाभले होते.

Photography
YIN Art Festival : स्टॅन्डअप कॉमेडी अन्‌ मिमिक्रीने मनमुराद हसविले!

"ग्लोबलायझेशनमुळे प्रत्येकाला फोटोग्राफरची संधी उपलब्ध झाली आहे. त्यातही शार्प फोटोग्राफर होण्यासाठी जो शार्पनेस लागतो तोच प्रशिक्षित फोटोग्राफरकडे असतो. नेमकी हीच संधी ‘सकाळ-यिन’ कला महोत्सवाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. हीच संधी या विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी आहे."

- प्रा. डी. एल. पवार, परीक्षक

"अलीकडे फोटोग्राफी ही प्रोफेशनल झाली आहे. व्यावसायिक फोटोग्राफी करताना त्यामध्ये नवनवीन टेक्नॉलॉजी आल्या आहेत. त्या आजचे विद्यार्थी सहज आत्मसात करू शकतात. त्यांना ही संधी ‘सकाळ-यिन’ कला महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. या संधीचा फायदा फोटोग्राफी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने घेतली पाहिजे."

- चैतन्य वाघ, परीक्षक

Photography
YIN Art Festival : ‘Hiphop- Bollywood’चा झटका अन्‌ लावणीचा तडका!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com