Fraud Crime: योगीराम सुरतकुमार शैक्षणिक संस्थेत गैरप्रकार; डॉ अद्वय हिरेंसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

Yogi Ramsuratkumar Educational Institution and Adavy Hiray
Yogi Ramsuratkumar Educational Institution and Adavy Hirayesakal

Fraud Crime : मालेगावस्थित योगीराम सुरतकुमार शैक्षणिक संस्थेत शिक्षणसेवक नियुक्तीचे बनावट आदेश व कागदपत्रान्वये शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. अद्वय हिरे यांच्यासह दहा जणांविरोधात नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

दोन दिवसांपूर्वीच भद्रकाली पोलिसांत हिरे कुटुंबीयांसह संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Yogi Ramsuratkumar Educational Institute Irregularities in appointment of teaching staff exposed nashik fraud crime)

नाशिक रोड पोलिसांत शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक संचालक लिंबाजी दौलतराव सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार, योगीराम सुरतकुमार शैक्षणिक संस्था, मालेगाव या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अद्वय प्रशांत हिरे (रा. मालेगाव), उपाध्यक्ष अशोक मुरलीधर बच्छाव (मृत), सचिव रियाजआली अबीदआली जहागीरदार (रा. मालेगाव), कोशाध्यक्ष प्रसाद रमेश खैरनार (रा. वऱ्हाणेपाडा, ता. मालेगाव), विश्वस्त दिलीप सीताराम केसकर (रा. जळगाव निंबायती, ता. मालेगाव), श्रीराम भीमराव पवार (रा. राहणे मळा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), सिद्धार्थ रमेश निकम (रा. गंगापूर रोड, नाशिक), तत्कालीन मुख्याध्यापक केदा त्र्यंबक भदाणे (रा. मालेगाव), उपशिक्षिका प्राजक्ता प्रकाश ठाकूर (रा. मालेगाव), तत्कालीन नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव या दहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव तालुक्यातीलच योगीराम सुरतकुमार शैक्षणिक संस्था (मालेगाव) या शिक्षण संस्थेत शिक्षक नेमणुकीत गैरप्रकार झाल्याची बाब शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीअंती उजेडात आली आहे.

Yogi Ramsuratkumar Educational Institution and Adavy Hiray
Jalgaon Fraud Crime: अकाली विधवा झालेल्या तरुणीशी मैत्री करून फसवणूक; इन्स्टाग्रामवर मजुराचा झाला डॉक्टर

या प्रकारामुळे खडबडून जागे झालेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने या शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह तत्कालीन मुख्याध्यापक, संबंधित कर्मचारी आणि तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालकांविरोधात थेट पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शिक्षण उपसंचालकांच्या या धडक निर्णयामुळे शिक्षणसेवक भरतीत गैरप्रकार करणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे.

असा आहे प्रकार

योगीराज सुरतकुमार शैक्षणिक संस्था (मालेगाव) या संस्थेतर्फे रावळगाव येथे समाजश्री डॉ. प्रशांत हिरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चालविले जाते. या संस्थेत शिक्षणसेवक म्हणून प्राजक्ता ठाकूर यांची नियुक्ती बेकायदेशीर केल्याची बाब तपासाअंती उघडकीस आली आहे. संस्था संचालक, मुख्याध्यापक, कर्मचारी व तत्कालीन उपसंचालक यांनी संगनमताने शासनाची फसवणूक करीत अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. सदरचा प्रकार १५ जून २०१७ ते ६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला आहे.

Yogi Ramsuratkumar Educational Institution and Adavy Hiray
Nashik Fraud Crime: मालेगावच्या कर सल्लागाराला बनावट पावत्याप्रकरणी अटक; 86 कोटींचे बनावट इनव्हॉइस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com