Nashik Crime News: चांदवडला तरुण शेतकऱ्याचा खून; पूर्ववैमनस्यातून हल्ल्याचा संशय

Died Farmer Sopan Zalte
Died Farmer Sopan Zalteesakal
Updated on

चांदवड (जि. नाशिक) : तालुक्यातील कातरवाडी येथील शेतकरी पिता-पुत्रावर मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, संशयितांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Young Farmer Murdered at chandwad nashik Latest Crime News)

Died Farmer Sopan Zalte
Bus Fire Accident: अपघातस्थळी सिग्नलच्या चारही बाजूने गतिरोधक अन् रस्ता रुंदीकरण

तालुक्यातील कातरवाडी येथील सोपान बाबूराव झाल्टे (४०) त्यांच्या राहत्या घरात पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. त्या वेळी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर वडील बाबूराव महादू झाल्टे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिकला पाठविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच मनमाडचे उपविभागीय अपर पोलिस अधीक्षक समीरसिंग साळवे, चांदवडचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चोख बंदोबस्त ठेवला. या घटनेचा चांदवड पोलिस कसून तपास करीत आहे. पिता-पुत्रावर झालेल्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे कातरवाडी परिसर मात्र हादरला आहे.

Died Farmer Sopan Zalte
Heavy Rain Damage : नळकसला ढगफुटीसदृश्‍य पावसाचा हाहाकार; शेतकरी हतबल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhagan Bhujbal on Nashik road potholes
Nashik Pothole Issue
Nashik Weather Alert Saptashrungi Gad Nanduri Ghat Closed for Traffic Due to Heavy Rain and Strong Winds
The former Zilla Parishad school student has become an inspiration for rural and tribal students across Maharashtra.
Marathi News Esakal
www.esakal.com