Nashik : कुसूरला बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Near lake villagers rush to find Mr. Gaikwad
Near lake villagers rush to find Mr. Gaikwadesakal

येवला (जि. नाशिक) : तालुक्यातील कुसुर येथे पोळ्याच्या दिवशी तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. शुक्रवारी (ता. २६) सकाळी अकराच्या दरम्यान कुसूर येथील तरुण शेतकरी मधुकर उत्तम गायकवाड (वय ३५) पोळ्याच्या पूर्वतयारीसाठी गावालगत असलेल्या पाझर तलावात बैल धुण्यासाठी घेऊन गेले असता पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. (young man from Kusur drowned who went to wash bulls Nashik Latest Marathi News)

Near lake villagers rush to find Mr. Gaikwad
Dinesh Bagul Bribe Case : ‘वरदहस्ता’ मुळे बागूल ‘आदिवासी’त मोकाट

बैल धुण्यासाठी गेलेले मधुकर खूप वेळ होऊनही बाहेर न आल्याची शंका येताच त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना समजताच पाझर तलावाच्या काठावर गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सुमारे दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मधुकर गायकवाड यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जागेवरच पंचनामा केला. मृतदेह येवला ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. संध्याकाळी मधुकर गायकवाड यांच्यावर कुसूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गायकवाड यांच्यामागे दोन मुली, मुलगा व पत्नी असा परिवार आहे. तिघांनाही अत्यंत कमी वयात पितृछत्राला पारखे व्हावे लागले आहे. या प्रकरणी येवला तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Near lake villagers rush to find Mr. Gaikwad
Bike Theft Crime : शहरातून 6 दुचाकींची चोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com