Nashik | शहरात हत्यांचे सत्र सुरूच, RTO ऑफिसजवळ तरुणाची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik | शहरात हत्यांचे सत्र सुरूच, RTO ऑफिसजवळ तरुणाची हत्या

Nashik | शहरात हत्यांचे सत्र सुरूच, RTO ऑफिसजवळ तरुणाची हत्या

sakal_logo
By
योगेश मोरे

नाशिक : शहरात सध्या हत्येचे सत्र सुरू असतानाच पेठ रोडवरील RTO कार्यालय येथे मध्यरात्रीच्या सुमारास एकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. तसेच शहरातील पोलिसांच्या गस्ती बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरात हत्यांचे सत्र सुरूच, RTO ऑफिसजवळ तरुणाची हत्या

राजेश शिंदे ( रा. भराडवाडी, फुलेंनगर ) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी रात्री राजेश शिंदे दुचाकीवरून घरी जात असताना आर टी ओ कार्यालया समोरील रस्त्यावर अज्ञात हल्लेखोरांनी शिंदे यास अडवून डोक्यात दगड टाकला. त्यात शिंदे जागीच मृत्यू झाला. त्याची हत्या कोणी व का केली याबाबत पोलीस माहिती घेत असून रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा: ड्रग्ज कमी प्रमाणात बाळगणे गुन्हा नाही? सरकार विधेयक मांडणार

हेही वाचा: नाना पटोलेंना मंत्रिपद? काँग्रेस नेते दिल्लीकडे रवाना

loading image
go to top