esakal | कोरोनामुळे तरुण बनताहेत मद्यपी; सोशल मीडियावरील फुकट सल्ले महागात

बोलून बातमी शोधा

liquor
कोरोनामुळे तरुण बनताहेत मद्यपी; सोशल मीडियावरील फुकट सल्ले महागात
sakal_logo
By
दिपक घायाळ

विंचूर (जि.नाशिक) : कांदा खाल्ल्याने, मालेगावचा काढा घेतल्याने, द्राक्ष खाल्ल्याने, जलनेती केल्याने, सकाळी कोमट पाणी प्यायल्याने, वाफ घेतल्याने कोरोना बरा होतो, असे अनेक गावठी उपचार करण्याचे सल्ले डॉक्टरांसह अनेक वैद्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले आहेत. त्यापैकीच एक सल्ला म्हणजे मद्य पिणाऱ्याला कोरोना होत नाही. यामुळे तरुण पिढी मद्याकडे वळू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावरील फुकटचे सल्ले महागात

मद्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते. तसेच, सॅनिटायझरमध्ये असलेल्या अल्कोहोलमुळे कोरोनाचे विषाणू मरतात. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते, तर मद्यामध्येही अल्कोहोल असते. त्यामुळे मद्य कोरोनावर रामबाण औषधच असल्याचा सल्ला काही व्यक्तींनी सोशल मीडियावर दिल्यामुळे बरेच तरुण मद्याकडे आकर्षिले जात आहेत. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. जे तरुण पूर्वी थोडेफार मद्य घ्यायचे त्यांचेही प्रमाण वाढले आहे. कोरोना होऊ नये म्हणून मद्य घेत होते. परंतु, मद्यपींनाही कोरोनाची बाधा होऊ लागल्याने सोशल मीडियावर मिळालेला सल्ला फोल ठरत आहे.

हेही वाचा: धडपड, आक्रोश अन्‌ हुंदक्‍यांनी नाशिक सुन्न! रुग्णालयात अंगावर काटा आणणारे दृश्‍य

कोरोनामुळे तरुण बनताहेत मद्यपी

सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल व इथेनॉलचे प्रमाण ७० टक्के असते. त्यामुळे सॅनिटायझर हाताला लावल्याने जीवाणू मरतात. मद्यामध्ये जरी अल्कोहोलचे प्रमाण असले तरी कोणत्याही प्रकारचे मद्य कोरोनावर प्रभावी औषध ठरत नाही. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी वेळोवेळी साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे व सोशल डिस्टन्सिंग ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर करावा. - डॉ. शैलेश काळे, विंचूर

मद्यपींना कोरोना होत नाही, अशी माहिती सोशल मीडियावर वाचल्याने मी रोज सायंकाळी मद्याचे एक-दोन पेग पित बिनधास्त रहात होतो. तरीही मला कोरोनाची बाधा झाली. यावरून मद्यपींनाही कोरोनाची बाधा होते. मद्य हे कोरोनावर औषध नाही. त्यामुळे सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. - कोरोनाबाधित रुग्ण, विंचूर