Nashik News : पैशांचा तगादा लावल्याने देवळ्यात युवकाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death news

Nashik News : पैशांचा तगादा लावल्याने देवळ्यात युवकाची आत्महत्या

देवळा (जि. नाशिक) : हात उसनवारीने घेतलेले पैसे परत करावेत असा तगादा लावल्याने येथील चोवीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी देवळा पोलिसांनी संशयित दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकास अटक करण्यात आली आहे तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. हर्षल संजय गायकवाड (वय २४. रा.विद्यानगर, देवळा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. (Youth commits suicide in temple due to money dispute Nashik News)

संजय गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित प्रवीण सदाशिव आहेर (रा.तीसगाव, ता. देवळा) व अमोल निकम ( रा. दाभाडी ता.मालेगाव) यांच्याकडून २१ लाख रुपये हातउसनवार घेतले आहेत.

त्यापोटी फिर्यादी यांनी वरील दोघांना तीन धनादेश दिले होते. मात्र खात्यावर पैसे नसल्याने हे धनादेश वटले नाहीत. यामुळे या दोघांनी फिर्यादीचा मुलगा हर्षल संजय गायकवाड यास प्रत्यक्ष भेटून तसेच मोबाईलवर वारंवार धमकी देत पैशांचा तगादा लावला.

या त्रासाला कंटाळून हर्षल याने शनिवार (ता.११) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी कोणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रवीण आहेर या संशयितास अटक केली असून अमोल निकम याचा पोलिस शोध घेत आहेत. हर्षल हा गायकवाड दांपत्य यांचा एकुलता एक मुलगा होता.