नाशिक जिल्‍ह्‍यात कोरोनाचे शून्‍य बळी; दिवसभरात ११७ कोरोनामुक्‍त

coronaupdates
coronaupdatesesakal

नाशिक : कोरोना (Corona) महामारीच्‍या दुसऱ्या लाटेत जिल्‍ह्‍यात मोठी जीवहानी झाली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असतांना, कोरोना बळींची संख्या नियंत्रणात आलेली आहे. शनिवारी (ता.९) जिल्‍ह्‍यात दिवसभरात एकाही बाधिताचा कोरोनामुळे बळी गेला नाही. या आठवड्यात दुसऱ्यांदा दिवसभरातील मृतांची संख्या निरंक राहिली. दिवसभरात ६३ रुग्‍णांचे कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आले. ११७ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्वीरीत्‍या मात केली. यातून ५४ ने घट झाली असून, यामूळे उपचार घेणााऱ्या बाधितांची संख्या आठशेच्‍या आत आली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात ७८७ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

रुग्‍ण संख्या घटल्याने जिल्‍हावासीयांना दिलासा

एकीकडे कोरोनाच्‍या बळींची संख्या आटोक्‍यात आलेली आहे. दुसरीकडे नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या अधिक राहाते आहे. यामुळे ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत मोठी घट सुरु असून, यामुळे जिल्‍हावासीयांना दिलासा मिळालेला आहे.
शनिवारी नाशिक ग्रामीणमधील ३९, नाशिक शहरातील २२, मालेगाव महापालिका क्षेत्रातील व जिल्‍हा बाहेरील प्रत्‍येकी एका रुग्‍णाचा कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. ११७ रुग्‍णांनी दिवसभरात कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. यापूर्वी ४ ऑक्‍टोबरला जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे मृतांचा आकडा निरंक होता. या आठवड्यात दुसऱ्यांदा मृतांचा आकडा निरंक राहिला.

coronaupdates
उपवासामुळे वाढलेले वजन कमी करायचे? ट्राय करा या हेल्दी डिश

सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार २७५ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी ९०२ अहवाल नाशिक ग्रामीणमधील असून, नाशिक महापालिका क्षेत्रातील २०२, मालेगावमधील १७१ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा कायम होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५६० रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ५४१ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात चार तर डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात एक रुग्‍ण दाखल झाला. नाशिक ग्रामीणमधील तेरा, मालेगावच्‍या एका रुग्‍णाचा संशयितांमध्ये समावेश आहे.

coronaupdates
Nashik : युतीसाठी मनसे उत्सुक, भाजप मात्र अनुत्सुक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com