esakal | Nashik | युतीसाठी मनसे उत्सुक, भाजप मात्र अनुत्सुक! 'या' गोष्टीची भिती
sakal

बोलून बातमी शोधा

mns bjp

Nashik : युतीसाठी मनसे उत्सुक, भाजप मात्र अनुत्सुक!

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिका निवडणुकीत (nashik muncipal corporation) भाजपला (bjp) सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी शिवसेना, (shivsena) कॉंग्रेस (congress) व राष्ट्रवादी कॉंग्रेस (ncp) महाविकास आघाडी म्हणून निवडणुक लढण्याची तयारी करतं असताना दुसरीकडे भाजप व मनसेची (MNS) युती चर्चा सुरु आहे.

...तर सत्तेत वाटेकरी होता येईल

पुढील वर्षाच्या सुरुवातीला नाशिकसह राज्यातील अठरा महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडी म्हणून मैदानात उतरल्यास भाजपला सत्तेपासून दुर ठेवता येईल. असा मतप्रवाह तयार झाला आहे. त्यातून नाशिक महापालिकेसाठी महाविकास आघाडीच्या बैठका घेण्याचे नियोजन सुरु आहे. सन २०१२ मध्ये महापालिकेत सत्तेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणुक तयारी सुरु असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार मैदानात उतरतं असतील तर भाजप बरोबर युती व्हावी अशी ईच्छा मनसेचे कार्यकर्ते व्यक्त करतं आहे. भाजप सोबत युती झाल्यास मनसेला आधार मिळून काही प्रमाणात सत्तेत वाटेकरी होता येईल असे मनसे कार्यकर्त्यांना वाटत आहे.

हेही वाचा: पुढच्या 3 तासात राज्यातील 'या' भागात गडगडाटासह मुसळधार

मनसैनिकांना भाजप बरोबर युती हवी असली तरी....

मनसैनिकांना भाजप बरोबर युती हवी असली तरी उत्तर भारतीय मतांवर परिणाम होण्याच्या भितीने भाजप मनसे सोबत युती करण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका व पुढील वर्षात होणाया उत्तर प्रदेश निवडणुकीवर मनसे-भाजप युतीचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने भाजपकडून युती बाबत अद्याप कुठलीचं भुमिका घेतली जाणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

उत्तर भारतीय मतांची भिती

मराठी मतांचे विभाजन करून आत्मा असलेल्या मुंबई महापालिकेपासून शिवसेनेला रोखता येणे शक्य असल्याने भाजप मध्ये देखील मनसेसोबत युतीचा एक मतप्रवाह आहे. परंतू सोबत घेतल्यास मनसेला अधिक फायदा होईल असे दिसून येत आहे तर भाजपला उत्तर भारतीय मतांची चिंता आहे. पुढील वर्षात उत्तर प्रदेशात निवडणुका होत आहे. मनसेने उत्तर भारतीय नागरिकांविरोधात यापुर्वी आघाडी उघडली होती. अद्यापही अधुनमधून मराठीच्या डरकाळ्या फोडताना उत्तर भारतीयांना लक्ष केले जाते. मनसे सोबत युती झाल्यास मुंबईतील उत्तर भारतीय मते मिळतील कि नाही? याबाबत साशंकता आहे. मुंबई पेक्षा उत्तर प्रदेशातील मतदारांवर मनसे युतीचा नकारात्मक प्रभाव पडण्याची भिती असल्याने भाजप मध्ये मनसे सोबत युती करताना सावध भुमिका घेतली जात आहे.

२०१२ मध्ये भाजप सोबतीला

उत्तर भारतीय मतांची चिंता भाजप मध्ये व्यक्त केली जात असली तरी सन २०१२ मध्ये नाशिक महापालिकेत मनसेला सत्ता स्थापनेसाठी पहिले अडिच वर्षे भाजपने मदत केली होती. त्याबदल्यात उपमहापौर व प्रभाग समिती सभापती पदे भाजपला मिळाले होते. सन २०१२ मधील पंचवार्षिक च्या दुसया टर्म मध्ये भाजपने पाठींबा दिला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने मनसेने सत्ता मिळविली होती. पहिल्या टर्म मध्ये निवडणुकीनंतर झालेल्या युती होवू शकते तर पुढील निवडणुकांमध्ये देखील भाजप-मनसेची युती शक्य असल्याचे दाखले युतीसाठी उत्सुक असलेल्या भाजप व मनसेच्या पदाधिकायांकडून दिले जात आहे.

हेही वाचा: "...म्हणून त्यांना सोडलं"; NCBचं नवाब मलिकांच्या आरोपांना उत्तर

loading image
go to top