दिंडोरी- तालुक्याच्या पश्चिम भागातील जनतेचे माझ्यावर अतोनात प्रेम असून, या भागतील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मी सतत प्रयत्नशील असतो. आगामी काळातही जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.