Nashik Zilla Parishad
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेला विविध योजनांतर्गत मिळणारा थेट निधी बंद करण्यात आल्याने त्यावर मिळणारे व्याजही थांबले असून, परिणामी जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. शासनाने ‘व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिटरी अकाऊंट’ (व्हीपीडीए) प्रणाली लागू केल्याने येत्या मार्चमध्ये सादर होणाऱ्या वार्षिक अंदाजपत्रकात लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.