नाशिक: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कामवाटप समितीविषयी ठेकेदारांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अखेर या विभागांनी कामांची यादी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. बांधकाम विभाग क्रमांक तीनच्या कार्यकारी अभियंत्यांनी साडेचार कोटींची ११२ कामांची यादी प्रसिद्ध करत त्यासाठी इच्छुक संस्थांकडे अर्ज मागविले आहेत.