Gram Sevak Award
sakal
नाशिक
Nashik Gram Sevak Award : नाशिक जिल्हा परिषदेच्या 'आदर्श ग्रामसेवक' पुरस्कारांची घोषणा! १५ ग्रामसेवकांचा बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
Zilla Parishad to Honour 15 Ideal Gramsevak Officers for 2024–25 : नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे 'आदर्श ग्रामपंचायत अधिकारी' (ग्रामसेवक) २०२४-२५ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रभावी प्रशासन, विकासकामांची कार्यक्षम अंमलबजावणी व जनताभिमुख सेवा या निकषांवर निवड झालेल्या १५ ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते बुधवारी जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत गौरविण्यात येणार आहे
नाशिक: जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातर्फे देण्यात येणारे ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ (ग्रामसेवक) २०२४-२५ या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते बुधवारी (ता. १९) सकाळी साडेनऊला जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत हा सोहळा होणार आहे.
